आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , जे के भोसले मार्ग , नरीमन पॉइंट येथे अ. भा. म. ना. परिषदेच्या विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपस्थित असलेले अ. भा. म. ना. परिषदेचे तहहयात विश्वस्त मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आणि मा. श्री. शशी प्रभू तसेच अ. भा. म. ना. परिषदेचे अध्यक्ष व पदसिद्ध विश्वस्त श्री. प्रसाद कांबळी, अ. भा. म. ना. परिषदेचे प्रमुख कार्यवाह व पदसिद्ध विश्वस्त श्री. शरद पोंक्षे यांमध्ये नाट्यपरिषद , यशवंत नाट्यसंकुल , परिषदेच्या आगामी नियामक मंडळाच्या निवडणुका यावर साधक बाधक चर्चा होऊन काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले .
संगीत रंगभूमी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार..
भावपूर्ण श्रध्दांजली.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या सद्य, सत्य आणि संवैधानिक परिस्थितीवर सोम. दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेली पत्रकार परिषद
ज्येष्ठ नाटककार 'शफाअत खान' यांना त्यांच्या 'गांधी आडवा येतो' या नाटकासाठी राज्य पुरस्कार जाहीर..
हार्दिक अभिनंदन..💐
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून नाटककार, अभिनेते, गीतकार, निर्माते, दिग्दर्शक श्री. श्रीरंग गोडबोले यांची नियुक्ती झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन. ![]()
नवनिर्वाचित रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य म्हणून श्री. सतीश पावडे, श्री. भालचंद्र कुबल, डॉ.महेंद्र कदम, डॉ.वृंदा भरूचा, श्रीमती गौरी लोंढे, श्री. जयवंत शेवतेकर, श्री. रमेश थोरात, श्री. शंकर (दिपक) रेगे, श्री. प्रविण तरडे, प्रा.श्री. महेश थोरवे पाटील, श्री. विजय चोरमारे, श्री. चंद्रकांत शिंदे, श्री. सुनील ढगे, प्रा.डॉ. संपदा कुलकर्णी, श्री.प्रभाकर दुपारे, श्री. दिलीप पांडुरंग कोरके, श्री. किशोर आयलवर, लिना भागवत, श्री. अनिल दांडेकर, श्री. दिलीप ठाणेकर, श्री. सतिश लोटके, श्रीमती स्मिता शरद भोगले, श्री. मधुकर पा. नेराळे, श्री. प्रदीप राधाकृष्ण कबरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आदरणीय खा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांना ८० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sharad Pawar 💐
शास्त्रीय व आधुनिक संगीत प्रकार जाणणारे प्रयोगशील संगीतकार 'नरेंद्र भिडे' यांचे दु:खद निधन...
भावपुर्ण श्रद्धांजली... 🙏💐
माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस , व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस आदी नाटकांचे संगीतकार.
ख्यातनाम छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, ज्येष्ठ नेपथ्यकार 'मोहन वाघ' यांचा आज जन्मदिन..
विनम्र अभिवादन..!! 🙏💐
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मालिका आणि नाट्य सृष्टीत छाप पाडणारे,
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक 'विनय आपटे' यांची आज पुण्यतिथी...
विनम्र अभिवादन..!! 🙏💐